
महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा नवा संकल्प





वसई, १२ ऑगस्ट २०२५ —
सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेली प्रिया फाउंडेशन आता नव्या जोमाने पुढे सरसावली आहे. सन शाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे संस्थेच्या कार्यलयाचे भव्य उद्घाटन डॉ. मनोज सिंह, ऍड. गिरीश दिवाणजी आणि सिका भट्टाचार्य यांच्या हस्ते पार पडले. रिबीन कापून सामाजिक परिवर्तनाचा नवा टप्पा सुरू करण्यात आला.
या ऐतिहासिक क्षणी, संस्थेच्या चळवळीचे प्रेरणास्थान व संस्थापक अध्यक्ष प्रिया भट्टाचार्य यांचा वाढदिवसही आनंदात साजरा करण्यात आला. केक कापताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आणि हसऱ्या चेहऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमाला युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबीना मुल्ला, कामगार नेताचे उपसंपादक जावेद खान पठाण, फॅशन स्टेशनचे असोसिएट संपादक हिम्मतलाल परमार, तसेच प्रिया फाउंडेशनच्या सचिव शांता भास्कर, निकिता, रेणू, पत्रकार ताहीर आणि रामजी पारसनाथ त्रिपाठी यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रिया फाउंडेशनचा संकल्प
महिला, बालक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या सक्षमीकरणासाठी लढा देत, सामाजिक न्यायाची नवी पहाट उजाडवण्याचा निर्धार संस्थेने केला आहे. नवीन कार्यलयातून सामाजिक जनजागृती, कायदेशीर मदत, कौशल्यविकास आणि जनहिताचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जाणार आहेत.
“प्रत्येकाच्या हक्कासाठी, प्रत्येकाच्या आवाजासाठी” हा संस्थेचा मंत्र ठरून सामाजिक कार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
