

मीरा-भाईंदर(प्रतिनिधी) : शहरात सुरू असलेल्या एका पुनर्विकास प्रकल्पावरून भाजपच्या अंतर्गंत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा बोजवारा उडाला आहे! प्रकल्पातून तब्बल १० टक्के भागीदारी आणि डामडौलदार टेरेस फ्लॅट लाटण्याच्या हव्यासापोटी सत्ताधाऱ्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याच पक्षातील एका खमक्या कार्यकर्त्याने (देवराम मेदोरा) या लुटमारीचा बंडाचा झेंडा उभारत थेट गंभीर आरोप केले आहेत.या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या खेळात माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे सख्खे छोटे बंधू आणि माजी महापौर डिंपल मेहता यांचे पती विनोद मेहता यांच्यावर थेट टेरेस फ्लॅटची लाच मागितल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
- मागणी नाही मानली, म्हणून पत्रांचे शस्त्र: हव्या असलेली ‘मलई’ किंवा फ्लॅट न मिळाल्यामुळे संतापलेल्या नरेंद्र मेहता आणि माजी महापौर डिंपल मेहता यांनी आपल्या अधिकृत लेटरहेडचा गैरवापर करत प्रशासनाला प्रकल्पाची परवानगी रोखण्याचे फर्मान सोडले.
- पत्रांच्या प्रती थेट माध्यमांत: सर्वसामान्य जनतेच्या आणि पक्षाच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या या नेत्यांची पत्रे आता चव्हाट्यावर आली असून, या राजकीय लुटीच्या प्रक्रियेमुळे भाजपची पोलखोल झाली आहे.
सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या महापालिकेच्या नगररचना विभागाचा कारभार पूर्णपणे वटारलेला असून, अधिकारी थेट नियम आणि कायद्याला धाब्यावर बसवून बिल्डर व नेत्यांच्या तालावर नाचत असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मीरा-भाईंदर महापालिकेत धडक देत आयुक्तांसमोर नगररचना विभागाचे प्रमुख शिंदे यांना धारेवर धरले.
- एक महिन्याचा अल्टिमेटम: पालिकेचा हा कारभार अत्यंत लाजीरवाणा असून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे सक्त आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
- जनता दरबारचा बडगा: सामान्य जनतेच्या ल¸टीला आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आता दरमहा नियमितपणे ‘जनता दरबार’ भरवला जाईल, अशी घोषणा करत मंत्र्यांनी लाभाऊ नेत्यांना सज्जड दम भरला आहे.
या प्रकरणी दाखल झालेल्या पोलिस तक्रारी आणि अधिकृत कागदपत्रांच्या आधारे या भ्रष्ट साखळीतील चेहऱ्यांचे बुरखे आणखी कसे टरकरणार, हे आगामी तपासातूनच स्पष्ट होईल!
