

बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ गेली सलग 12 वर्षे लोकनेते श्री.हितेंद्र ठाकूर, प्रथम महापौर श्री.राजीव पाटील,युवा आमदार श्री.क्षितीज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आमदार दहीहंडी उत्सव मनवेलपाडा येथे शासनाचे सर्व नियम पाळत साजरा करीत आहे.
दरवर्षी या दहीहंडी उत्सवामध्ये मनवेलपाडा विभागातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी,तसेच आपला देश,आपले राज्य व समाजासाठी योगदान देणारे यांचा गुणगौरव केला जातो.
परंतु यावर्षी कोरोनाविषाणूचे वाढते संक्रमण पाहता सदर दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार नाही. त्यामुळे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन करणार आहेत.
कृपया सन 2020 साली इयत्ता दहावी शालांत परीक्षा व बारावी परीक्षेत 85 टक्के हून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व आधार कार्ड किंवा मनवेल पाडा विभागातील रहिवास पुरावा याची फोटो कॉपी खालील मोबाईल नंबर वर सोमवार दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत व्हाट्सअप करावी.
श्री.प्रशांत राऊत कार्यालय
9923709191
तसेच इतर अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल नंबर वर संपर्क करावा.
श्री.प्रशांत राऊत,मा.स्थायी समिती सभापती 9823259449
श्री.प्रशांत राऊत कार्यालय 9923709191
श्री.स्वप्नील पाटील 8698698691
श्री.धवल पाटील* *8097441111
कृपया सर्व दहीहंडी पथके,इयत्ता दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी,सर्व कार्यकर्ते व महिला मंडळ कार्यकर्त्या यांनी याची नोंद घ्यावी.
श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळातर्फे दरवर्षी एक सामाजिक भान लक्षात ठेवून महापौर सहायता निधीला मदत केली जाते.परंतु यावर्षी करोना विषाणू च्या वाढत्या संक्रमण काळात वसई तालुक्यातील जनतेला गेले 5 महिने विनामूल्य अन्न धान्य,खिचडी वाटप तसेच वैद्यकीय सुविधा,कोरोना पेशंटला ठेवण्यात येणारे हॉस्पिटल, आयसोलेशन सेंटर येथील पेशंटला नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण विनामूल्य पुरवठा करणारे श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट,ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट,विवा चॅरीटेबल ट्रस्ट,यंग स्टार ट्रस्ट यांना देणगी देण्यात येणार आहे.
आयोजक
श्री.अजिव पाटील,मा.नगरसेवक संघटक सचिव
श्री.प्रशांत राऊत,मा.सभापती स्थायी समिती
श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ