रविवारच्या सुट्टीच्या दिवशी उघडावे लागले तहसील कार्यालय

१० नोव्हेंबर पर्यंत सर्व मागण्या मार्गाला लागल्या नाही तर पुर्ण ताकदीने आंदोलन करणार

वसई तालुक्यातील विविध मुलभूत प्रश्नांवर तहसीलदार कार्यालयावर बेमुदत आमरण उपोषण व ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. लाल बावट्याच्या काॅम्रेड अरुणा मुकणे सोमवारी १ नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषणाला बसणार होत्या. त्याच बरोबर शेकडो कार्यकर्ते बेमुदत ठिय्या आंदोलन करणार होते. या संदर्भात लेखी निवेदन वसई तहसीलदार कार्यालय व वसई पोलिस स्टेशन येथे देण्यात आले होते.
या प्रकरणी तात्काळ लक्ष घालत वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत-बनसोडे यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी दिनांक ३१/१०/२१ रोजी दुपारी ३ वाजता लाल बावट्याचे शिष्टमंडळाला चर्चेला बोलावले. यावेळी वसई पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कर्पे, अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमरसिंह पाटील, निवासी तहसीलदार हेलकर उपस्थित होते. तर लाल बावट्याच्या शिष्टमंडळात काॅम्रेड शेरू वाघ, काॅम्रेड अरुणा मुकणे, काॅ.सुचिता चौव्हाण, भारती जाधव, पवित्रा थापड, अशोक खोत, हरेश लोथडे, रेखा घोषा, श्रुतीका राउत हे होते.
यावेळी एकूण १५ मागण्या रेटून धरल्या होत्या. प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक चर्चा पार पडली. येत्या १० नोव्हेंबर पर्यंत सर्व मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन तहसीलदार उज्वला भगत बनसोडे व निवासी तहसीलदार हेलकर यांनी दिले. या दरम्यान लाल बावट्याचे काॅम्रेड अरूणा मुकणे यांनी वसई तहसीलदार यांना इशारा दिला आहे की, आमची फसवणूक करता कामा नये. अन्यथा पुर्ण ताकतीने आंदोलन करू. आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस तालुका प्रशासन जबाबदार असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *