
मुंबईसह सयुंक्त महाराष्ट्र मिळविणाऱ्या हुतात्म्यांचे बलिदानाची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासाची आहे. या बलिदानात कष्टकरी, कामगार, शेतकरी होते. मग ते कोणत्याही जातीचे असोत त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी केली,
महाराष्ट्राचा इतिहास आहे कि त्यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. परंतु महाराष्ट्रावर भाजपा प्रणित नेमलेले महामहिम राज्यपाल यांनी जातीयवादी वक्तव्य करून मुंबई विशिष्ट समाजाची पाठराखण करून समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. *महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या जाहीर वक्तव्याचा निषेध करण्यासाठी *मा.जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज वसई स्टेशन येथे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राज्यपाल यांच्या विरुद्ध चलेजावं च्या घोषणा देत निषेध करण्यात आला
यावेळी सर्व फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
