
आश्विन सावरकर यांनी अनेक वेळा निवेदने देऊनही पेल्हार येथील परमार इंडस्ट्री कडील तलावाचे सुशोभिकरण व संरक्षण भिंत बांधण्यासाठी निवेदन दिले होते. पेल्हार येथील परमार इंडस्ट्री कडील तलावाकडे मोठ्या प्रमाणात नागरिक व इंडस्ट्री असल्याने ह्या तलावात इंडस्ट्री चे रासायनिक युक्त पाणी जात असल्याने येथील नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.ह्या तलावाचा उपयोग येथील नागरिक गणपती विसर्जन तसेच अनेक धार्मिक कार्य करण्यासाठी करतात.ह्या तलावाला संरक्षण भिंत नसल्याने अनेक वेळा ह्या तलावात मुलांचा मृत्यू ही झाला आहे.
पेल्हार येथील परमार इंडस्ट्री कडील तलावाचे सुशोभिकरण व तलावभोवती संरक्षक भिंत बांधण्यात यावी.जेणेकरून भविष्यात होणारे मृत्यू चे प्रमाण तसेच येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही.
.अशी मागणी भाजप युवा मोर्चा वसई पूर्व मंडळ सरचिटणीस आश्विन प्रमोद सावरकर यांनी प्रभाग समिती पेल्हार(एफ) चे सहाय्यक आयुक्त यांना केली आहे
