
वसई, दि. 26 ऑगस्ट 2025 –
पावसाळ्यात पाणी साचणे, नाले तुंबणे आणि अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यांना सामोरे जावे लागणाऱ्या सातीवली – कुवरपाडा परिसरातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून तातडीने गटारे साफ करण्याची आणि पाणी निचरा सुरळीत करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे.
ही कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हा सरचिटणीस रोहित रमेश ससाणे व तालुका उपाध्यक्ष कमरुद्दीन शेख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही महापालिकेकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने दोन्ही नेत्यांनी प्रशासनावर दबाव आणला आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी लढा उभारला.
स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत, “आमच्या परिसरात महिन्यांपासून अस्वच्छता आणि पाणीसाच्याचा त्रास होता. अखेर आमच्या आवाजाला प्रतिसाद मिळाला,” असे समाधान व्यक्त केले.
या प्रकरणी बोलताना रोहित ससाणे म्हणाले –
“स्वच्छता व पाणी निचरा ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. हे काम करणं ही महापालिकेची जबाबदारी आहे. आम्ही जनतेच्या हितासाठी लढत राहू, जोपर्यंत प्रत्येक घराला योग्य नागरी सुविधा मिळत नाहीत.”
ही कारवाई म्हणजे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाचा विजय असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.
नागरिकांनी केलेल्या कौतुकामुळे प्रशासनालाही पुढील काळात अधिक जबाबदार होण्याचा संदेश मिळाला आहे.
