
नाशिकमध्ये आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामुळे शहर अक्षरशः दणाणून गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट रस्त्यावर उतरला.
मोर्चाचे नेतृत्व मा. पंडित कांबळे (प्रदेशाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग), मा. सुधाकर भालेराव (आमदार व प्रवक्ते), मा. सुरेशराव पगारे (जिल्हाध्यक्ष जळगाव), मा. संजय गालफाडे (शहराध्यक्ष नाशिक शहर), मा. आत्माराम नगराळे (प्रदेश सरचिटणीस) या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाले.
नेत्यांनी प्रखर शब्दांत सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले –
“शेतकऱ्यांचा आक्रोश हा सरकारसाठी शेवटचा इशारा आहे. वीजदरवाढ, पिकांचे पडलेले दर, कर्जमाफीतील दिरंगाई, पाणीटंचाई – या सगळ्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट रस्त्यावरूनच उत्तर देईल.”
मोर्चादरम्यान घोषणाबाजी, आक्रोश आणि लढाऊ वातावरणामुळे संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले. शेतकऱ्यांचा रोष आणि संताप उफाळून आला.
नेत्यांनी जाहीर इशारा दिला –
“शेतकऱ्यांचा न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील. सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरले तर हा आक्रोश वादळात बदलल्याशिवाय राहणार नाही.”
