
पालकांनो आपल्या मायेची ऊब, कमी होत आहे असं दिसतंय ? जो पर्यंत बाळ रडत नाही ,तो पर्यंत आई बाळाला दूध प्यायला देत नाही, असंच असतं हो असच असतं ? म्हणूच आपल्या मायेची ऊब कमी झाल्याची जाणीव भासत आहे. कृपया ती कमी होऊ देऊ नका , कायदा हा केव्हाही आणि कसा ही बदलू शकतो ,हे खरं आहे आणि हे खरंच आहे.जर रस्त्याच्या बाजूचे ,५०० मीटर अंतरावर असणारे ,मदिरा -दुकाने हॉटेलस ( बार ,वाईन शॉप) सुरू होऊ शकतात ,तर जी आर मध्ये बदल का नाही ? लोकशाही असूनही ,जर खुनी, नेता,आमदार ,खासदार,मंत्री,आणि काहीही बनू शकतात आणि सत्ता चालवू शकतात तर जी आर मध्ये बदल का नाही? अरे ती तर चिमुकली बाळं आहेत, त्यांनी काय अपराध केलाय सांगावं ? मुळात हा जी आर काढला ते काय डोक्यावर पडले होते ,की त्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली होती,की त्यांच्यातले ….. संपलं होतं ,मुळात हेचं कळत नाही, त्यांनी समोर यावं आणि आपल्या प्रश्नाची उत्तरं द्यावी .आपलं पत्रं ,आपला संदेश ,त्यांच्या पर्यंत आपण पोहचवला आहे, पण ते आपल्या समोर येत नाही ,आपल्याला वेळ देत नाही आहेत, त्याचं म्हणणं असं आहे की ,आम्ही हा जी आर २०१७ मध्येच शाळेला दिला होता ,पण शाळेने तो पुढे का कळवला नाही ,याचं उत्तर त्याच्याकडे नाही ,त्याच असं ही म्हणणं आहे की, अशा बऱ्याच शाळाचें पत्र ,आमच्याकडे आले आहेत ,आम्ही त्या त्या शाळांवर योग्य ती कारवाई करणार आहोत. पण कधी ? हो पण कधी ? मग आतापर्यंत तुम्ही का थांबलात ? *कारण* सर्वात जास्त भ्रष्टाचार हा *शिक्षण विभागात* चालतो , कदाचित आतापर्यंत त्यांच्या घरी पाकीटही पोहचली असतील .त्यांना काय करायचं आहे शिक्षणाचं .आज मी तर उद्या नवीन, नवीन मंत्री नवीन कायद्या .आता जे मिळतं ते घ्या, बरोबर ना ? कदाचित उद्या (या आठवड्यात )ते आपल्याला भेटतील सुद्धा ,भेटल्यावर आपल्याला ,असं आश्वासन सुद्धा देतील ,मागील महिन्यात आम्ही ,जी १५ दिवसांची शिथीलता दिली आहे ,ती ३१ डिसेंबर २०१९ पर्यत करतो ,पण तुम्ही मिडिया कडे वगरे, किंवा पुढे जाऊ नका ,पण जी १५ दिवसांची ,जी शिथीलता दिली आहे ती ओरली दिली आहे लेखी नाही,
जर ती मुलं एप्रिल मध्ये पुढेच गेली नाही तर ?आपण काय करायचं ,हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभाच आहे ना ?, म्हणूनच म्हणतो आपणा सर्वांना एकत्र यायलाच हवं,आणि असं काही तरी करायला हवं, की ,कुठला ही नवीन कायदा म्हणा किंवा जी आर आला तर तो, काढणारा, किमान १०० वेळा तरी नक्कीच विचार करेल, म्हणूनच म्हणतो आपण आपल्या मायेची ऊब कमी झाली आहे, याची उणीव कुणालाच भासवू नका. अजूनही आपल्या ६ मुलाच्या पल्यानी, स्वाक्षरी (सह्या ) केल्या नाही आहेत, त्यांची नावे ग्रुप वर टाकावी असं वाटत असेल ,तर कृपया सांगावं ,तो मेसेज आपण ग्रुप वर टाकू शकतो, म्हणणं एवढंच की ,आपण सर्वांनी एकत्र यावं आणि शिक्षण भ्रष्टाचारीला आळा घालावा ही विनंती