

” विघानसभा की कोड “
राजकारणाच्या जंगलात पेटला
विधानसभा नावाचा वनवा .
पक्ष सृष्टी म्हणे आपापले नेते,
कार्यकर्ते वाचवा रे वाचवा .
नविन कोल्हे कुई इथ तिथ
ऐकु यायला लागली .
राष्ट्रवादी काॅंग्रेसला अगणित
गळती लागली .
पाच वर्षापुर्वीचा नारा कायम
आहे घर घर में हर हर .
सामान्य माणुस म्हणतोय कधी
थांबेल आमची मर मर .
घड्याळ म्हणतेय माझीच वाईट
का चालु झालीय वेळ .
काॅंग्रेसमघ्ये तर कुणाचा कुणाला
नाही राहीला आता मेळ.
नव्याने विलास तरेनी शिवबंधन बांधुन
हाती घेतला भगवा .
मुख्यमंत्री साहेब जनतेलाही ते डॅशिंग
रसायन जरास पाठवा.
पुरग्रस्त अजुनही वाट बघताहेत कधी
त्यांची वसतील घरे.
महाजनादेश यात्रा, संवाद सभा, जन
आशिर्वाद यात्रांचे वाहतेय वारे .
वंचित दिवसेंदिवस पुढे जातांना, संपर्क
वाढवतांना दिसले.
राणेंची राजकीय गणित मुख्यमंत्र्यांमुळे
अजुन अनुत्तरीतच राहीले .
वसई विरारकडे ही मोठ्या पक्षांचे लक्ष
केंद्रित दिसले .
विधानसभा निवडणुकीची कोडे काहीसे
उलगडले अन कही जण दुखावले .