

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 नालासोपारा मतदारसंघ-132 मधून नागरिकांच्या मुलभूत अधिकारांसाठी तसेच प्रस्थापितांची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी स्थानिकांचा आवाज होऊन विधानसभेमध्ये नालासोपारा मतदार संघातील सुमारे 5 लाख मतदारांचा आवाज पोहोचवण्यासाठी परिवर्तन लढा…एक क्रांतीची चाहूल नालासोपारा मतदार संघातून निवडणूक लढत आहे. विरार-नालासोपारातील विविध संघटना यांना विचारात घेऊन मराठी माणसाचां आवाज विधानसभेत पोचवण्यासाठी स्थानिक व मराठी उमेदवारच असला पाहिजे. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून सामान्य व्यक्ती ही निवडणूक लढवू शकते हा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यासाठी व महाराष्ट्रात सुरू असलेली घराणेशाही मोडून काढण्यासाठी आम्ही एक छोटेसे पाऊल उचलत आहोत.
मतदारसंघातील शिक्षण संस्थेने चालवलेली लूट, महारुग्णालयांचा प्रश्न, स्थानिक तरुणांना उद्योगधंदे च्या मार्फत रोजगार उपलब्ध करून देणे यासारखे अनेक गंभीर प्रश्न विधानसभेत पोचवण्यासाठी आपला हक्काचा माणूस असावा म्हणूनच परिवर्तन लढाचे संस्थापक जे संपूर्ण महाराष्ट्रभर अत्याचारग्रस्ताच्या न्याय, हक्कासाठी प्रशासकीय मार्गाने व रस्त्यावर उतरून लढा देतात. असे आपला हक्काचा मराठी तरुण आद. सुशांत मधुकर पवार हे नालासोपारा मतदारसंघ-132 मधून विधानसभा लढवणार आहेत.
धनशक्ती आणि राजकीय शक्ती ही एका सामान्य घरातील तरुणाला निवडणुकीत पराभूत करू शकत नाही हे दाखवून देण्याची संधी आपणास मिळालेली आहे. याच संधीचा फायदा घेवून तुमच्या सोबत राहणारा आणि सदैव तुमच्या प्रश्नांना वाचा फोडणारा तुमचा स्वतःचा प्रतिनिधी आमदार म्हणून जाण्याची संधी तुम्ही द्याल याच आशेने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.