वसई (एस.रहमान शेख ) दिनांक 02.01.2020 रोजी सायंकाळी 7:55 वाजता वालीव पोलिस ठाणे हदिदतील चिंचोटी गावात प्रवेश करणारे रोडचे पलीकडील पूर्व बाजूस असलेल्या पानाच्या टपरी शेजारी सार्वजनिक रोडवर नायगांव पूर्व ता. वसई जि. पालघर यातील आरोपीत नामे प्रदीप शिवदत्त सिंग वय 30 वर्षे रा. दि. आशानगर गौशाळेच्या पुढे चिंचोटी वसई (पूर्व) ता.वसई जि. पालघर हा आपले कब्जता अवैधरीत्या स्वतःच्या कब्जात प्लेन पिवळया रंगाच्या पिशवीत हिरवट रंगाचा व उग्र वास असलेल्या झाडाच्या पाला सदृश्य चुरा असलेला 2 किलो 910 ग्रॅम इतके वजनाचे गांजा हा अमली पदार्थ व 2 किलो वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ बेकायदेशीर रित्या बाळगला असताना मिळून आला. आरोपित याचे ताब्यातून 1) 500/- रुपये रोख रक्कम 2) 17000/- रुपये किमतीच्या 2 किलो 910 ग्रॅम वजनाचा मिळून आलेला गांजा हा अमली पदार्थ असा एकूण 17,500/- रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपित याचे विरुद्ध वालीव पोलीस ठाणे गु.र.न.ll 05/2020 एन डी पी एस ऍक्ट कलम ८(क),22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विलास चौगुले प्रभारी अधिकारी , वालीव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *