

विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायमूर्ती बी एच लोया यांचे सन 2014 मध्ये नागपूर येथे मृत्यू झाले होते त्यांच्या मृत्यू संशयास्पद होता म्हणून त्यावेळी अनेक सामाजिक संघटनेच्या लोकांनी सदर प्रकरणाचा तपास करावा अथवा सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करून अनेक वेळा आंदोलन केले होते परंतु तत्कालीन सरकारने सदर आंदोलनाची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नव्हती.देशातील जनतेसमोर न्यायमूर्ती बी एच लोया यांचे मृत्यू झाले आहे की हत्या करण्यात आली आहे हे सिद्ध होणे गरजेचे आहे.आपल्या देशात लोकशाही आहे जनतेची मागणी असल्यास ते स्वीकार करून खरी परिस्थिती जनतेसमोर आणणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे.वरील प्रकरणी राज्य शासनाने (S.I.T.) ची नेमणूक करून न्यायमूर्ती बी एच लोया यांच्या मृत्यूची चौकशी करावी व न्यायमूर्तींची हत्या झाली आहे असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करावे अशी मागणी बहुजन महापार्टी तर्फे ठाणे पालघर जिल्हा प्रभारी मन्सूर सरगुरोह पालघर जिल्हा अध्यक्ष हनुमंत देवकर वसई विरार शहर मुख्य सचिव अजय पाल,शेख सलाउद्दीन, डेविड थॉमस, अन्वर हुसैन, रवींद्र गोरे यांनी यांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी वसई श्री स्वप्निल सुभाष तांगडे यांची भेट घेऊन तसे निवेदन देऊन राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे न्यायमूर्ती बी एच लोया यांच्या मृत्यूचा तपास करण्यात यावे यासाठी राज्य शासनाने (S.I.T.) ची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.