
वसई (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाउन घोषित केल्यामुळे असंख्य कामगारांची वाताहत होऊ लागली.दररोजच्या कामातून मिळणाऱ्या पैशावर उपजीविका भागविण्यासाठी दैना होऊ लागली त्यांच्या उपासमारीची वेळ आली असताना बहुजन महापार्टीने हजारो गरजूंना धान्य वाटप केले.बहुजन महापार्टीचे शमसुद्दीन खान यांनी लॉक डाउन संपे पर्यंत आम्ही अशी मदत करत राहणार असे जाहीर करून नागरिकांना माणुसकीचे हात दिला. वसई पूर्व नायगाव राजवली वाघरालपाडा येथे अनेक गरिबांची वस्ती आहे.हाताला काम नाही म्हणून अनेक घरा मध्ये चुलही पेटत नव्हती.नागरिक कोणीतरी मदत करेल या आशेवर जगत होते.हे सर्व चित्र बघितल्यामुळे बहुजन महापार्टीने घरोघरी जाऊन धान्य वाटप केले.आदिवासी नागरिकांनाही मदत देण्यात आली.बहुजन महापार्टीने कोणत्याही जातपतचा भेदभाव न करता धान्य वाटप केले हे विशेष माना वे लागेल.मागील तीन दिवसांपासून तांदूळ डाळ तेल मसाला चहा पावडर व साखर या वस्तूचे वाटप तीन हजार नागरिकांना करण्यात आले.नागरिकांना कोरोनाचा भीतीपेक्षा भुकेची जास्त चिंता निर्माण झाली आहे हे शमसुद्दीन खान यांच्या लक्षात आले असून त्यांनी सढळ हस्ते मदत केली व ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांनाही रेशन द्यावे अशी मागणी सरकारकडे केली आहे.