

वसई : वसई-पाचू बंदर येथील वसई मच्छीमार सोसायटीच्या आवारात बेकायदेशीर मासळी बाजार भरत असून; या बाजारात ‘सोशल डिस्टनसिंग’च्या सगळ्या नियमांची वायझेड होत असतानाही पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत.
पोलिसांना वसई मच्छीमार सोसायटीकडून फुकट मासळी मिळत असल्यानेच पोलीस या ठिकाणी कारवाई करत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
पोलिसांच्या आणि वसई मच्छीमार सोसायटीच्या या अशा हरकतीमुळे इतर नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने नागरिकांनी संतापही व्यक्त केला आहे.
या बेकायदेशीर बाजाराबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारीही केल्या आहेत. किमान या बाजारात सोशल डिस्टनसिंगची नियमावली तरी पाळली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लॉकडाउन दोन वेळी या ठिकाणी भरलेल्या भाजी बाजारात चेंगराचेंगरी झाली होती. त्यानंतरही मच्छीमार सोसायटीला शहाणपण आलेले नाही.
वसई-विरार शहरात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता या मासळी बाजारातून संसर्ग फैलावल्यास कोरोनाचा मोठा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी बेकायदा बाजार भरवणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Ek baar alkapuri dekh lo syam ko mela lagta hai