

१८ जानेवारी २०२१ रोजी रोजी मिरा भाईंदर युवक कॉंग्रेस च्या वतीने आदरणीय मुझफ्फर भाऊ हुसैन व सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनात, युवक जिल्हाध्यक्ष दीप काकडे यांच्या नेतृत्वात अर्णब गोस्वामी विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. काशीमिरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हातात ‘गद्दार अर्णब’ ‘देशद्रोही अर्णब ला अटक करा’ “त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता” असे कल्पक फलक घेऊन निषेध करण्यात आला.
लिक झालेल्या चॅट मधून समोर येत असणाऱ्या माहिती आधारे, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांच्या शहादत वर अर्णब ला टीआरपीचे आकडे दिसून हसू येत होते. अशा देशातील सेनेबद्दल इन-सेन्सेटिव्ह असणारा माणूस पत्रकार नाही दलाल आहे. आणि सत्ताधारी भाजपावर मेहरबानी करून देशाची दिशाभूल करणारा आहे. अशा नालायक माणसांवर देशद्रोहा चा गुन्हा दाखल करून सख्त कारवाई झाली पाहिजे असे प्रतिपादन युवक अध्यक्ष दीप काकडे यांनी केले.
भाजप ची देशभक्ती खोटी
एरव्ही छोट्या छोट्या करणावरून देशभक्तीचा आव आणणाऱ्या भाजपाचे नेत्यांची नाव जेव्हा चॅट मधून समोर येत आहेत तेव्हा सगळे भाजप चे नेते बिळात लपले आहेत. अशा खोट्या देशद्रोही भाजपच्या नेत्यांनी आरश्यात स्वतःच सिहवलोकन करून जनतेशी प्रामाणिक राहील पाहिजे. देशातील जनता बेजार आहे आणि त्यांना मुद्द्यापासून भरक्तवण्यासाठीच दलाल अर्णब गोस्वामी सारख्या पत्रकार रुपी राक्षसांना भाजप अभय देते. अशांना जनता धडा शिकवेल. असे दीप काकडे म्हणाले.