



०८ मार्च जागतिक महिला दिनी तहसिलदार वसई यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करून त्वरित निलंबित करण्याची हजारो आदिवासी महिलांची जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे मागणी वसई तालुक्यातील आदिवासी समाज्याच्या हजारो महिला तर्फे ०८ मार्च जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी पालघर यांना आदिवासी एकता परिषद महिला तर्फे हजारो सह्याचे १३८ पानाचे पुराव्या सहित निवेदन देऊन तहसिलदार वसई ह्या वसई तालुक्यातील सरकारी जमीन भूमाफिया , चालमाफिया , वाळूमाफिया , ह्यांना पाठीशी घालून सरकारी जागा हडप करण्यासाठी सहकार्य करीत असल्यामुळे वसई तालुक्यातील पिढ्यान पिढ्या पासुन राहत असलेल्या आदिवासी गोरगरीब लोकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे सदर अन्याया विरोधात आदिवासी एकता परिषद वसई तालुका या संघटने मार्फेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता आदिवासी व गोरगरीब लोकांचा आवाज दाबण्यासाठी तहसिलदार वसई ह्या आदिवासी गोरगरीब लोकांची घरे तोडण्याची धमकी देत आहेत म्हनून तहसिलदार वसई यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा नोंद करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे , तसेच वसई तालुक्यामधे , दारू , बियर , देशी दारू , ह्या मद्य विक्रिचे प्रमाण खूप वाढल्यामुळे गोरगरीब लोकांचा संसार उधवस्त होऊन त्यांच्या कुंटुबातील मुलांनवर उपासमारीची वेळ येऊन त्यांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होत आहे म्हनून वसई तालुक्यातील सर्व प्रकारचे मद्य परवाना सरसकट रद्द करून वसई तालुक्यातील सर्व प्रकारची मद्य विक्रिची दुकाने बंद करण्यात यावी , तसेच वसई तालुक्यातील खाजगी शाळामधे शाशनाच्या निर्णया प्रमाणे २५ टक्के आदिवासी गोरगरीब समाज्याच्या मुलांना फि माफ करून मोफत शिक्षण देण्यात यावे , तसेच वसई तालुक्यामधे आदिवासी समाज्याच्या लोकांनवर अन्याय अत्याचार करणार्यावर भारतीय राज्य घटनेप्रमाणे त्वरित अँक्ट्रासिटी अँक्ट प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात यावे , तसेच वसई तालुक्यामधे आदिवासी सुशिक्षित मुलांना व वयोवुध आदिवासी नागरीकांना शाशनाच्या नियमानुसार त्वरित मासिक भत्ता देण्यात यावा , तसेच वसई तालुक्यामधे लाईट गेल्यामुळे आदिवासी समाज्याच्या लोकांना अंधारात राहावे लागत आहे म्हनून प्रतिमहीना दहा लिटर राँकेल देण्यात यावे, त्याच प्रमाणे आदिवासी समाज्याच्या लोकांना , अंत्योदय , बी पी एल , केसरी रेशनकार्ड धारकाना धान्य कमी केल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे म्हनून सदर रेशनकार्ड आदिवासी कुंटुंबाना प्रति महीना ४५ किलो तांदुळ , ०५ किलो गहू , ०५ किलो साखर , ०१ किलो चहापावडर , ०५ किलो तुरडाळ , ०२ किलो गोडेतेल , ०१ किलो मसाला , अर्धा किलो हलद , रेशनिंग दुकानात देण्यात यावे, जेनेकरून आदिवासी गोरगरीब लोकांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळू शकेल , तसेच वसई तालुक्यातील पिढ्यान पिढ्या पासुन सरकारी व मालकी जागेत राहात असलेल्या आदिवासी समाज्याच्या लोकांच्या घराखालील जागा घर मालकाच्या नावे करून आदिवासी पाड्याचे सर्व करून त्याची नोंद , गाव नकाशा, तालुका नकाशा , झोन नकाशा व सातबार्यावर करण्यात यावी अश्या मागण्या आदिवासी एकता परिषद वसई तालुका या संघटनेच्या महिला मार्फेत ०८ मार्च या जागतिक महिला दिनी हजारो आदिवासी महीलांनी १३८ पानाचे पुराव्या सहीत निवेदन जिल्हाधिकारी पालघर यांना देऊन त्वरीत तहसिलदार वसई यांच्यावर कार्यवाही करण्यात यानी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहेत , सदर निवेदन आदिवासी एकता परिषद वसई तालुका कमिटीचे दत्ता सांबरे , वंदना जाधव , प्रकाश जाधव , कविता उमतोल , किशोर लिलके , शैला झिंबल , गिता गरेल , जयस्री तांबडी, वनिता पालवे , सरिता रावते , संगिता वरठे , नवसू भावर , लता सावंत , सोनाली जाधव , हेमा पाटिल , राजेश भंडार , इत्यादी तर्फे सदर निवेदन देण्यात आले , तसेच सोबत पुरावे कागद पत्राच्या प्रति जोडण्यात आल्या आहेत , तसेच सदर निवेदनाच्या प्रति , मा. मुख्यमंत्री साहेब , मा. गुहमंन्री साहेब , मा. आदिवासी विकास मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंन्त्रालय मुंबई ,मा. खासदार राजेंद्र गावित साहेब , मा. प्रांत साहेब वसई , मा. पोलिस उपायुक, साहेब वसई व विरार विभाग मा. पोलिस निरिक्षक साहेब वसई पोलिस ठाणे , मा. पोलिस निरिक्षक साहेब अर्नाळा सागरी पोलिस ठाणे , मिरा भायंदर वसई विरार पोलिस आयुक्तालय यांना देण्यात आल्या आहेत. ,,,,