वेलंकनी यात्रेकरू संघटना

आज सकाळी वेलंकनी यात्रेकरू संघटनेने माननिय खासदार गोपाळ शेट्टी हयांची बोरीवली येथे भेट घेऊन बीजेपीचे युवा जिल्हा सचिव व वेलंकनी संघटनेचे सदस्य रिक्सन तुस्कानो हयांनी निवडणुकीतील विजयाबद्दल पुष्पगुच्छ देऊन खासदार साहेबांचे अभिनंदन केले.

या प्रसंगी वेलंकनी यात्रेकरू संघटनेचे अध्यक्ष मायकल डिमेलो हयांनी वेलंकनी करीता येत्या वर्षीही स्पेशल रेल्वे गाड्या मिळाव्यात म्हणून संघटनेतर्फे निवेदन सादर केले. दिनांक 26 ऑगस्टला कुर्ला ते वेलंकनी व 27 ऑगस्टला वाद्रे-वसई रोड ते वेलंकनी तसेच परतीच्या प्रवासासाठी 8 व 9 सप्टेंबर वेलंकनी ते वसई व दादर अशा गाडया मिळाव्यात म्हणून विनंती केली .दरवर्षी हया गाडया उपलब्ध करून देण्यात खासदार गोपाळ शेट्टी साहेब हयांचे आपल्याला सहकार्य लाभते त्याबद्दल समस्त वसईकर आणि मुंबईकर भाविकातर्फे शेट्टी साहेबांना धन्यवाद देण्यात आले. खासदार साहेबांनी या कामी पुरेपुर सहकार्य करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

या प्रसंगी बीजेपी वार्ड 56 चे युवा अध्यक्ष डेरिक डाबरे, संघटनेचे सहकारी विजू वाझ, मार्शल कोरीया व मोझेस रॉड्रीग्ज हयांचे ही सहकार्य मिळाले व नेहमी सहकार्य करणारे चालीँ दादा काही कारणास्तव उपस्थित नव्हते पण त्यांचा ही आशीर्वाद आमच्या जोडीला होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *