आश्विन सावरकर हे सतत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या प्रयत्न करत असतात. नालासोपारा फाटा येथील ब्रीज च्या खाली असणाऱ्या बोगद्यात रस्त्याची परिस्तिथी अतिशय बिकट झालेली आहे . सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची ये जा होत असते.ह्या ठिकाणी रस्त्यावर बरेच खड्डे पडलेले आहेत.त्यामुळे वाहतूक कोंडी तर निर्माण होतेच पण रोजचे अपघात देखील होतात तसेच नालासोपारा फाटा येथील ब्रीजच्या खाली सदर ठिकाणी वळण असल्याने वाहन वळवण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
नालासोपारा फाटा येथील ब्रीज च्या खाली असलेल्या बोगद्यात पडलेले खडे लवकरात लवकर भरून काढावी.
अशी मागणी भाजपा युवा मोर्चा वसई पूर्व मंडळ सरचिटणीस आश्विन सावरकर यांनी प्रभाग समिती एफ पेल्हार चे सहाय्यक आयुक्त यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *