
प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील वसई तालुका अंतर्गत मौजे मोरी सर्वे नंबर ५९/१५ या जमिनीबाबत शर्तभंग कारवाई करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुप्ता यांनी तक्रार अर्ज दिलेले असून सदर प्रकरणी वसई तहसील कार्यालयाकडून योग्य ती कारवाई केली जात नसल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार कार्यालयाला पत्र देऊन अहवाल मागविला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,पालघर जिल्ह्यातील वसई तालुका अंतर्गत मौजे मोरी सर्वे नंबर ५९/१५ या जमिनीबाबत शर्तभंग कारवाई करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुप्ता यांनी वसई तहसीलदार कार्यालय तसेच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी अर्ज दिला आहे. सदर बाबत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने वसई तहसीलदार यांच्या नावे दि. १२/६/२०२१ रोजी जा. क्र. महसूल /कक्ष.१/टे.१/टेनन्सी/कावि-२४५/२०२१ नुसार पत्र दिले. मात्र तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल मनोहर गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
https://bit.ly/gerda_2021 Герда 2021