वसई-विरार महानगरपालिकेचा ‘माहिती अधिकार’ की ‘माहिती लपवामोहीम’?

​सर डी. एम. पेटिट रुग्णालयातील मुदतबाह्य (Expired) औषध प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असताना, आता या प्रकरणावर पांघरूण घालण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.माहिती अधिकारांतर्गत (RTI) विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्य विभागाने जी माहिती दिली आहे, ती निव्वळ दिशाभूल करणारी आणि सत्य लपवणारी आहे:

  • निरीक्षण करताना दिसले, पण पत्रात ‘नाही’: माहितीच्या प्रत्यक्ष निरीक्षणावेळी जे कागदपत्रे, फाईल्स आणि नोटीसा दाखवण्यात आल्या, त्या अधिकृत पत्रात मात्र “माहिती उपलब्ध नाही” किंवा “निरंक” असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • प्रशासनाचा दुटप्पीपणा: जर फाईल्स अस्तित्वात आहेत, तर त्या कागदावर देण्यास प्रशासन का घाबरत आहे? ही माहिती लपवून नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे?

​१. भाजप नगरसेवकांनी उघड केलेल्या आणि युट्युबवर प्रसारित झालेल्या या गंभीर घोटाळ्याचे पुरावे गायब झाले की गायब केले गेले?

२. कोट्यवधींच्या औषध खरेदीत जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि पुरवठादारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना ‘अभय’ का दिले जात आहे?

३. सर डी. एम. पेटिट रुग्णालयातील त्या ‘कालबाह्य’ औषधांचा पंचनामा आणि जप्ती अहवाल देण्यास टाळाटाळ का?

“प्रशासनाने लक्षात ठेवावे, सत्य कागदावरून पुसता येईल, पण जनतेच्या स्मृतीतून नाही. माहिती लपवणे हा देखील एक गुन्हाच आहे!”

भ्रष्ट कारभाराचा बुरखा आम्ही फाडणारच!

न्यायालयीन लढा आणि लोकशाहीच्या मार्गाने या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला जाईल. असे तक्रारदार ह्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *