Month: March 2026

जिद्दीला सलाम! प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या ‘रणरागिणीं’चा विरारमध्ये होणार गौरव

​डिजिटल वृत्तसेवा, विरार ​संकटांच्या वादळाला न डगमगता, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला आता विरारमध्ये मानाचा मुजरा मिळणार आहे. ‘माणूसकी फाउंडेशन’ तर्फे जागतिक महिला दिनाचे…

पालघरमध्ये इंधन साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

​मटा ऑनलाइन वृत्त, पालघर ​जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. मात्र, पालघर जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून…

वसई-विरार फेरीवाला समिती निवडणूक कायद्याच्या कचाट्यात; उच्च न्यायालयाचा कठोर इशारा

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, वसई: ​वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पहिल्या ‘नगर पथ विक्रेता समिती’ (Town Vending Committee) निवडणुकीत नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप करत, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रक्रियेवर कडक ताशेरे ओढले आहेत.…

वसई-विरारचा विकास आता ‘पाटील पॅटर्न’ने!

​महापौरांचा मानधन त्याग आणि ‘रिव्हर्स बिडिंग’चा मास्टरस्ट्रोक; अर्थसंकल्पीय सभेत पारदर्शकतेचा नवा आदर्श ​ ​ प्रतिनिधी, विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेची विशेष अर्थसंकल्पीय महासभा बुधवारी पार पडली. या सभेत महापौर अजीव पाटील…

परीक्षेच्या तोंडावर मुख्याध्यापिकेची बदली; संतप्त पालकांनी शाळेला ठोकले टाळे

​वसई : तालुक्यातील वाघराळपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेची परीक्षेच्या तोंडावर अचानक बदली करण्यात आल्याने पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. शासनाच्या या निर्णयाचा निषेध म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी गुरुवारी शाळेला…

वसईत माहिती अधिकाराचा उघड बोजवारा : ३१ ग्रामपंचायतींमध्ये मनमानी, आदेश धाब्यावर; अपिलीय यंत्रणाही ठप्प

वसई तालुक्यात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अक्षरशः धाब्यावर बसवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तब्बल ३१ ग्रामपंचायतींमध्ये माहिती न देणे, आदेशांची जाणीवपूर्वक अवहेलना करणे आणि अपिलीय प्रक्रियेलाही विलंब लावणे…

प्रशासकीय भाषेचा ऐतिहासिक वारसा उलगडणार; आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या पुस्तकाचे शुक्रवारी विमोचन

​वसई: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वसईच्या भूमीत आगामी २७ मार्च रोजी एका महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लोकार्पण होणार आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी लिखित ‘पेशवेकालीन प्रशासनिक मराठी’ या पुस्तकाचे प्रकाशन…

महापालिकेचा ‘घरचा’ तपास; पेटीट रुग्णालयातील औषध घोटाळा दाबण्याचा प्रयत्न?

​युवाशक्ती एक्सप्रेस विशेष, वसई-विरार ​वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सर डी.एम. पेटीट रुग्णालयात कालबाह्य (एक्स्पायरी) औषधांचा साठा आढळल्याने खळबळ माजली असतानाच, आता पालिकेने नेमलेल्या चौकशी समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे,…

वसई-विरार फेरीवाला समितीच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान; ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्त, वसई/विरार ​वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वादग्रस्त ‘नगर पथ विक्रेता समिती’ (फेरीवाला समिती) निवडणुकीचा पेच आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नियमावलीची पायमल्ली करून…

प्रशासनाच्या आश्वासनानंतर विरारमधील पाणी प्रश्नावरचा मोर्चा स्थगित; तात्काळ दुरुस्ती सुरू…

​ ऑनलाइन प्रतिनिधी, विरार पूर्वेकडील शिरगाव आणि कातकरीपाडा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. संतप्त नागरिकांनी पुकारलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने तातडीने पावले…