मटा ऑनलाइन वृत्त, पालघर

​जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. मात्र, पालघर जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाचा कडक इशारा

​गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून इंधन टंचाईबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यावर जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, “अफवा पसरवणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय अपराध आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर प्रशासन कठोर कायदेशीर कारवाई करेल,” असा इशारा देण्यात आला आहे.

गर्दी न करण्याचे आवाहन

​जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे:

  • ​नागरिकांनी इंधनाचा विनाकारण साठा करू नये.
  • ​पेट्रोल पंपांवर गर्दी करून घबराट निर्माण करू नये.
  • ​पुरवठा साखळी नियमित सुरू असल्याने संयम राखावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *