वसई / पालघर: सामाजिक बांधिलकी जपत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक-अध्यक्ष मा. किरणजी गायकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. वसई तालुक्यातील कुवरपाडा (तिल्हेर) आणि म्हस्कीनपाडा (पोमण) येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकला असून, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.​हा सामाजिक उपक्रम आदिवासी सेना प्रतिष्ठानचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री. परेश सुकूर घाटाळ आणि पालघर जिल्हा सरचिटणीस श्री. किशोर जगन्नाथ ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अचूक नियोजनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.​या प्रेरणादायी कार्यक्रमास संघटनेतील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने:

  • श्री. मोहन हरवटे (वसई तालुका अध्यक्ष)
  • श्री. अनिल ठाकरे (वसई तालुका पूर्व अध्यक्ष)
  • श्री. किरण माळी (कामगार कार्याध्यक्ष)
  • श्री. राजेश गांगडा (कामण विभाग अध्यक्ष)
  • श्री. संदीप तुंबडा (खोलांडे – उपाध्यक्ष)
  • श्री. संदीप नोपती (गास विभाग अध्यक्ष, नालासोपारा पश्चिम)
  • श्री. संजू चिपाट (गास शाखा अध्यक्ष)
  • श्री. ईश्वर म्हाडा (वसई तालुका ग्रामीण संघटक)
  • श्री. लहू माळी (सल्लागार)

​तसेच कुवरपाडा व म्हस्कीनपाडा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.​कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षणानेच माणसाच्या व समाजाच्या जीवनाचा खरा विकास होतो. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त, कठोर परिश्रम आणि सामाजिक जाणिवांचा अंगीकार करून आपले भविष्य उज्ज्वल करावे.” मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना भावी शैक्षणिक प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.​स्थानिक स्तरावर राबवलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे दोन्ही शाळांतील शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून विशेष कौтुक होत असून, आदिवासी सेना प्रतिष्ठानच्या या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *