जलभराव उपाययोजनांवर काम न झाल्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांमुळे घरांमध्ये व दुकानांत अनेक दिवस पाणी साचले. शेवटी लोकांना प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. यासाठी जबाबदार कोण?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी पाणी साचल्याने बाधित झालेल्या आणि मृत्यु झाले व्यक्ति कुटुंबांना आर्थिक भरपाई व नॉकरी द्यावी आणि घरपट्टी माफ करावी

सामान्य नागरिकांच्या पैशांचा अपव्यय आणि अनेक घोटाळ्यांच्या प्रकरणावर पक्षाचे पदाधिकारी राबवणार जनजागृती मोहीम आणि करणार धरणे आंदोलन

जलभराव उपाययोजनेतील अनेक महत्त्वाच्या कामांबाबत मनपा आयुक्त पक्ष पदाधिकारी मोफत अहवाल देतील, परंतु अट अशी की इच्छाशक्ती दाखवून लेखी उत्तर देऊन काम करण्याचे आश्वासन द्यावे

विरार । या वर्षीही 16 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात जलभराव झाला. सामान्य नागरिकांच्या घरांत आणि दुकानांत अनेक फूटपर्यंत पाणी भरले. यामुळे लोकांना प्रचंड शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या । रोड वर कुठे 3 फूट तर कुठे 4 फूट पाणी साचलेले दिसून आले. घरांत पाणी शिरल्यामुळे लोकांची मोठी कुचंबणा झाली होती । लहान मुले रडत होती, वृद्ध असहाय्य झाले होते, सर्व बाजूंनी जणू संकटांचे डोंगरच कोसळले होते. वीजपुरवठा खंडित झाला होता, अन्नधान्याची टंचाई झाली होती, इतकेच नव्हे तर पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाले होते. अशा भीषण परिस्थितीत शासन-प्रशासनाकडून काही ठिकाणी कोणीही दखल घेतली नाही ।सामान्य नागरिकांना हे माहित नव्हते की त्यांनी भरलेला टॅक्स त्यांना मूलभूत सुविधा मिळवून द्यायला हवा होता, जो त्यांचा हक्क होता. पण त्यांच्याच पैशांची उधळपट्टी करण्यात येत होती. जलभराव हा नवा विषय नाही. 2017 आणि 2018 च्या जलभरावाच्या वेळी सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाने जलभराव उपाययोजनांसाठी आयआयटी मुंबई आणि निरीह संस्थेला काम दिले होते. त्यांनी काही महिन्यांत सर्वेक्षण अहवाल सादर केला आणि कुठे काय कामे करावी लागतील हे स्पष्ट केले. या सर्वेक्षण आणि अहवालासाठी सुरुवातीला 12 कोटी आणि नंतर 8 कोटी, असे एकूण 20 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती मिळते. हे पैसे सामान्य नागरिकांच्या टॅक्सच्या पैशांतून देण्यात आले होते । पण नेहमीप्रमाणेच सर्वेक्षण अहवाल (जो स्वतः एक घोटाळा मानला जातो) दिल्यानंतरसुद्धा उपाययोजनेवर कोणतेही काम करण्यात आले नाही. याचा खुलासा पत्रकार तसेच एनसीपी एसपी पक्षाचे पदाधिकारी कमर बेग यांनी आरटीआयद्वारे केला होता. सर्वेक्षण अहवालात नायगाव ते वसई, नालासोपारा आणि विरार या भागात एकूण 8 कल्व्हर्ट्स बांधण्याची सूचना केली होती. 3 ठिकाणी होल्डिंग पाँड (पूराचे पाणी साठवण्याची सोय) बांधायचे होते. त्यापैकी नालासोपारा चौथा रोड शनी मंदिराजवळ अनेक एकर जागेवर पाँड बांधायचे ठरले होते. तिथे सूचना फलकसुद्धा लावण्यात आला होता. पण फलक लावल्याच्या एका महिन्याच्या आत तो काढून टाकण्यात आला. याची माहिती कार्यकारी अभियंता पासून ते विभागीय सहाय्यक आयुक्तांपर्यंत दिली होती, पण कोणतीही कारवाई झाली नाही । विश्वस्त अधिकारी सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वेक्षणासाठी दिलेले 20 कोटी प्रत्यक्षात 2 कोटींचेही नव्हते. म्हणजेच प्रत्येक सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अशाच इतर सर्वेक्षण अहवालांवरही काही काम झाले नाही । एनसीपी एसपी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी 25 जुलै 2024 रोजी मुसळधार पावसात भिघुन मनपा मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. यात नागरिकांच्या मूलभूत सुविधा, इतर उपाययोजना आणि विकासाच्या मागण्यांसह गेल्या 15 वर्षांत वसई-विरारमध्ये झालेल्या उपाययोजनांमध्ये सर्वेक्षणाच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच चौकशी आणि ऑडिटची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना दिले, पण आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही ।वसई-विरारमध्ये सामान्य नागरिक आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत आणि भ्रष्टाचारामुळे त्यांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे, असे आरोप सतत होत आहेत । जलभराव उपाययोजनेसाठी आयआयटी मुंबई आणि निरीहला दिलेले 20 कोटी तांत्रिक अहवालासाठी असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी नागरिकांच्या हक्कासाठी आणि शहराच्या विकासासाठी मनपा आयुक्त मोफत अहवाल देतील. त्यात पीपीपी मॉडेलवर काम, केंद्र सरकारच्या विविध योजनांतून उपाययोजना आणि विकासासाठी काम करण्याचा अहवाल असेल. शासन-प्रशासन गंभीर असेल आणि काम करण्याची इच्छा शक्ती दाखवत नागरिकांच्या हितासाठी चर्चेला बोलावतील, तर उपाययोजनेवर मोफत अहवाल दिला जाईल. परंतु अट अशी की ठोस आश्वासन आणि लेखी उत्तर दिले जावे ।सध्या जलभराव उपाययोजनेवर आयआयटी मुंबई आणि निरीहच्या अहवालानुसार जे काम झाले नाही आणि ज्यामुळे नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या,काही व्यक्ति च मृत्यु झाला आणि घायल सुद्धा झाले त्या पीडित कुटुंबांना आर्थिक नुकसानभरपाई व एका ला नॉकरी आणि टॅक्समध्ये माफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी वसई विरार शहर जिल्हा मीडिया प्रमुख कमर बेग व पदाधिकारी मांगनी करत आहे । तसेच जलभराव “उपाययोजना वर तातडीने काम करा नाहीतर खुर्ची खाली करा” या घोषणेसह गणेश विसर्जनानंतर पक्षाचे पदाधिकारी याबाबत विचारविनिमय करून तारीख व वेळ निश्चित करून मनपा मुख्यालयासमोर मोठे आंदोलन करतील आणि नागरिकांना जागरूक करण्याची मोहीम राबवतील । असी सूचना पक्षा चे मीडिया प्रमुख कमर बेग द्वारे प्रेस नोट मध्ये देण्यात आला आहे ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *