मुंबई: बोरिवली विभागाचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणारे अधिकारी निनाद सावंत यांची दोन महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. या निमित्ताने विद्यार्थी नेते ॲड. संदीप केदारे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बोरिवली परिसरात कार्यरत असताना अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देणारा आणि प्रश्न मार्गी लावणारा अधिकारी म्हणून निनाद सावंत यांची ओळख राहिली आहे. त्यांच्या अनुभवाची आणि प्रशासकीय कार्यपद्धतीची दखल घेत दोन महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारीवर निवड झाली.

या सदिच्छा भेटीदरम्यान विविध सामाजिक आणि विद्यार्थ्यांशी निगडित विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. कायद्याच्या चौकटीत राहून पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाज पुढे नेण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. छायाचित्रात ॲड. संदीप केदारे आणि निनाद सावंत एकत्र दिसत असून, त्यांच्या या नवीन प्रवासासाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *