

बोईसर : दि.11/04/2020 रोजी पालघर जिल्ह्यातील एका व्हाट्सअप्प ग्रुप वर आरोपीत यांनी दोन धर्मीय गटात तेढ निर्माण व्हावा.तसेच एकोप्यास बाधा निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होईल या दृष्टीकोनातून व्हाट्सअप्प ग्रोउपवर पोस्ट प्रसारित केले बाबत पालघर टीटवर तक्रार प्राप्त झाली होती.त्या अनुषंगाने व्हाट्सअप्प ग्रुप अडमिन व पोस्ट करणारा आरोपित इसम यांची माहिती घेऊन त्याचे विरुद्ध बोईसर पोलीस ठाणे π122/2020भा. द.वि.स.का.कलम 153(अ)(ब)505(ब)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी गौरव सिंग पोलीस अधीक्षक पालघर, पालघर जिल्हातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की, सोशल मीडियावर चुकीचे अथवा कोणत्याही धर्माच्या,समाजाच्या भावना दुखावतील तसेच दोन धर्मा मध्ये ,समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल अशाप्रकारचे संदेश टाकू नये. अशा प्रकारचे कृत्य कोणी केल्यास अथवा त्यास प्रोत्साहन दिल्यास सदर इसमाविरुद्ध व ग्रुप अडमिन यांचे विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.पालघर जिल्हातील सर्व व्हाट्सअप्प ग्रुप अडमिन यानी आपले ग्रुपची सेटिंग send messages only group admin अशी करावी, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनेचा नागरिकांनी तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
It’s wonderful that you are getting ideas
from this post as well as from our argument made at this time.
P.S. If you have a minute, would love your feedback on my new website re-design.
You can find it by searching for “royal cbd” – no sweat
if you can’t.
Keep up the good work!