

ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते मा.विलास वाघ सर यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेडकराईट हिस्टरी काँग्रेस तर्फे शुभेच्छा डॉ संतोष बनसोड राष्ट्रीय सचिव
फुले, शाहू ,आंबेडकर विचारांचे अनुयायी,दलित परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, तत्त्वनिष्ठ प्रकाशक व संपादक आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून प्राध्यापक विलास वाघ यांची महाराष्ट्राला ओळख आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे प्रचारक म्हणून सुगावा प्रकाशनाच्या रूपाने प्रा.विलास वाघ व उषाताई वाघ यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विलास वाघ सरांचे कर्तुत्व समाज मनाने गौरवावे असेच आहे. ते नुसते प्राध्यापक होते असे नाही तर ते कृतिशील समाजसेवक आहेत ,अभ्यासक आहेत, परिवर्तनवादी भूमिकेचे प्रचारक आहेत,समाजप्रबोधन करणाऱ्या सुमारे पाचशे ग्रंथाचे प्रकाशक आहेत, उपेक्षित समाजघटकांच्या शिक्षण संस्थांचे संस्थापक आहेत आंतरजातीय विवाहाचे प्रचारक, प्रबोधक, मार्गदर्शक आणि संयोजक ही आहेत. आज त्यांचा 83 वा वाढदिवस त्यानिमित्ताने तथागत बुद्धिष्ट एज्युकेशन सोसायटीच्या वतीने साक्री रोडवरील भिमनगर परिसरातील धुणे-भांडी करणाऱ्या महिलांच्या मुलांना संस्थेचे खजिनदार शहाजी शिंदे यांच्या हस्ते शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रमासाठी मुलांनी व पालकांनी आभार व्यक्त केले
आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर संदेश वाघ यांचे काका प्रा विलास वाघ हे समता शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव आहेत. प्राध्यापक विलास वाघ यांनी मोराणे येथे आश्रम शाळा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय सुरू केले तळेगाव येथे मागासवर्गीय मुला करता आश्रम शाळा सुरू केली आंतरजातीय विवाह संस्था स्थापन केली. आंबेडकरी चळवळीत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सुगावा प्रकाशन तर्फे अनेक ग्रंथ संपदा प्रसिद्ध केल्या आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तेथे त्यांनी प्रौढ व निरंतर विभाग मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेडकराईट हिस्टरी काँग्रेस तर्फे डॉ संतोष बनसोड राष्ट्रीय सचिव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत