मानवतेची आणि सेवेची खरी प्रचिती देत लायन्स इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३१ A३) आणि लायन्स क्लब ऑफ वसई लक्ष्य यांच्या संयुक्त विद्यमाने वसईत एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. वसई गावातील झेंडा बाजार येथील सर डी. एम. पेटिट महानगरपालिका रुग्णालयात ‘हंगर प्रोजेक्ट नंबर २’ अंतर्गत ‘प्यार का नाश्ता’ हा उपक्रम नुकताच यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णालयातील ९७ गरजू रुग्णांना पौष्टिक नाश्त्याचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आले.

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ A३ चे हंगर चेअरपर्सन लायन श्रद्धा मोरे आणि जीएसटी चेअरपर्सन लायन सुमित अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. लायन मोनिका खरोडे आणि लायन करिश्मा गुजराल यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. रुग्णांना पौष्टिक पोह्यांचे वाटप करून त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत सार्थ आणि संवेदनशील पद्धतीने साजरा केला.

या संपूर्ण उपक्रमाचे नेटके नियोजन लायन दीपक बडगुजर, लायन राजेश अग्रवाल (डीसी हंगर), लायन सलीम मेमन, लायन श्रद्धा मोरे (जीएफए चेअरपर्सन – हंगर), लायन निलेश घरात (झेडसी), लायन बबिता चेड्डा (अध्यक्ष), लायन वनिता निनावकर (अध्यक्ष), लायन सुरेश काळे, लायन सतीश कोथमिरे, लायन राजेंद्र ढगे, लायन जिज्ञासा मायावंशी, लायन नूरजबीन अरशद खान आणि लायन श्रद्धा पवार यांच्या उत्साही चमूने केले.

या प्रसंगी डी. एम. पेटिट रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. राणी बदलानी या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत लायंस क्लबचे आभार मानले. समाजातील छोटासा वाटाही गरजूंच्या जीवनात मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, हेच या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

आता दर शनिवारी मिळणार ‘प्यार का नाश्ता’ पहिल्या दोन्ही उपक्रमांना मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आयोजकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘प्यार का नाश्ता’ हा उपक्रम आता केवळ एखाद्या दिवसापुरता मर्यादित न राहता, दर शनिवारी नियमितपणे राबवला जाईल, अशी घोषणा आयोजकांनी केली आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन नटवर बंका, प्रथम आणि द्वितीय गव्हर्नर लायन विकास सराफ व लायन सुनील लावटी यांचे या सेवाकार्याला सदैव सहकार्य लाभणार असल्याचे सांगण्यात आले.

मदतीचे आवाहन रुग्णालयातील असहाय्य आणि गरजू रुग्णांपर्यंत माणुसकीची ही शिदोरी पोहोचवण्यासाठी इतर नागरिक, लायन्स सदस्य आणि शुभचिंतकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे. इच्छुक नागरिक प्रायोजकत्व किंवा दानाच्या माध्यमातून या सुकार्यात सहभागी होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *