

वाघोबा, तुंगारेश्वर, दाभोसा आधी पंधरा प्रकारच्या नद्या, धबधब्यांना धोकादायक ठरवीत पर्यटकांना तेथे जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेशाद्वारे बंदी घातली होती.
पालघर : जिल्ह्यातील वाघोबा, तुंगारेश्वर, दाभोसा आदी १५ प्रकारच्या नद्या, धबधब्याना धोकादायक ठरवीत पर्यटकांना तेथे जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेशाद्वारे बंदी घातली होती. मात्र, ही बंदी धुडकावून लावत पर्यटकांनी रविवारची सुट्टी एन्जॉय केल्याचे दिसून आले.पावसाळ्यात धबधबे, धरण, तलाव किंवा नदी परिसरात फिरायला जाण्याच्या अनेकांचा प्लॅनचा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मनाई आदेशाने विचका होणार असल्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र पर्यटकांनी त्या आदेशाला न जुमानता बहुतांश ठिकाणी कुटुंबियांसह मनसोक्त भिजून रविवार एन्जॉय केला.