
मिरा रोड | १५ सप्टेंबर २०२६:


मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून यंदाही आयुक्त बंगल्यावर पर्यावरणपूरक (इकोफ्रेंडली) बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या या पवित्र वातावरणात पालिकेच्या वतीने शहरातील पत्रकारांसाठी एका विशेष स्नेहभोजनाचे आणि दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या आनंददायी वातावरणात ‘बहुजन महा व्ह्यूज अँड न्यूज’चे उपसंपादक श्री. घनश्याम आंबोकर यांनी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निवासस्थानी जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.यावेळी मनपा आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या शेजारी बसून श्री. घनश्याम आंबोकर यांनी बाप्पाच्या सानिध्यात मनमोकळ्या आणि आनंदमयी वातावरणात आयुक्तांशी विविध विषयांवर संवाद साधला. पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील सौहार्दपूर्ण व आपुलकीच्या नात्याचे एक उत्तम चित्र यादरम्यान पाहायला मिळाले.महानगरपालिका आयुक्त बंगल्यावर श्रीगणेशाची स्थापना करण्याचा हा सलग दुसरा वर्ष आहे. यंदाच्या उत्सवात पूर्णपणे शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देण्यात आले असून, आकर्षक व पर्यावरणपूरक सजावटीच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येत आहे.दर्शनासाठी आलेल्या सर्व पत्रकारांचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी स्वतः स्वागत करत आपुलकीने विचारपूस केली. पालिकेच्या वतीने उपस्थित पत्रकारांसाठी चहा-नाश्ता आणि प्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आयुक्तांनी स्वतः उपस्थित राहून केलेल्या या आदरपूर्वक आणि सन्मानपूर्ण पाहुणचाराबद्दल उपस्थितांनी विशेष समाधान व्यक्त केले.प्रशासकीय शिष्टाचार पाळून पत्रकार व प्रशासनाचे संबंध कसे सलोख्याचे असू शकतात, याचे उत्तम उदाहरण या सोहळ्यातून दिसून आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संस्कृती जपण्याचा हा उपक्रम आणि आयुक्तांची पत्रकारांप्रति असलेली आत्मीयता खरोखरच कौतुकास्पद ठरली आहे.
