



पालघर दि. 08 : जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.
मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचे उत्कृष्ठ कामकाज केलेल्या मतदान केद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांमध्ये लता कृष्णा दोनाडकर, रुपाली शंकर सावंत, सुवर्णा नामदेव भोर, शुभांगी संदिपान वडवले, प्रणिता प्रमोद मोरे, सुवर्णा विशाल धनू, प्रिया महेश कळंबे, वर्षाराणी विकास कारंडे, वंदना तामोरे, पुजा भोणे, स्विडल मार्टिन, लविना फरगोज, माधूरी दाते, मोनिका ब्राम्हणकर, प्रितल राऊत यांचा सामावेश होता.