पालघर दि. 21 : दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाकडुन ज्या महिला व संस्थांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य केले आहे अश्या महिला व संस्थांच्या सन्मानार्थ नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे. अशा महिला, संस्था व गट यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत 8 मार्च जागतिक महिला दिनांचे औचित्य साधुन “नारी शक्ती पुरस्कार” देण्यात येतो.

विधवा, परितक्त्या, निराधार, अपंग महिलांचे पुनवर्सन अशा कार्यात ज्या महिलांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत अशा महिला, संस्था व गटांना तसेच शैक्षणिक, प्रशिक्षण कार्य, पर्यावरण क्षेत्र, महिला स्वावलंबन, आणि शेती व्यवसाय काबाडकष्ट करणाऱ्या महिलांचे विविध तांत्रिक यंत्राद्वारे ज्या महिलांचे श्रम जाणीवपूर्वक कमी करण्यासाठी प्रयत्न केले अशा महिला संस्था व गट त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केले अशा महिला संस्था व गट यांनी अर्ज करावेत.

नारी शक्ती पुरस्कारासाठी वैयक्तिक अर्ज करणाऱ्या महिलेचे वय दि. 01 जुलै 2021 रोजी 25 पुर्ण असावे. त्याचबरोबर पुरस्कारासाठी संस्थात्मक अर्ज करणाऱ्या संस्था संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्ष कार्यरत असावी.

शासन पत्रात नमूद मार्गदर्शक सुचनानुसार नारी शक्ती पुरस्कारसाठी अर्जदाराने अर्ज / नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाइनव्दारे केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या वेबसाईडवर भरावयाचे आहे. केवळ ऑनलाईन अर्ज स्विकारले जातील तसेच अर्ज / नामनिर्देशन भरण्याची अंतिम तारीख 31/01/2022आहे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पालघर यांनी केले आहे.

नारी शक्ती पुरस्कारासाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *