वसई, (प्रतिनिधी) :

कायद्याची चौकट आणि सामाजिक सेवेची बांधिलकी यांचा अनोखा संगम साधत ‘लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्स’चा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा इन्स्टॉलेशन सोहळा नुकताच बाभोळा, वसई (पश्चिम) येथील ऑपुलेंट ग्रँड बँक्वेट्स येथे अत्यंत दिमाखात संपन्न झाला. रविवार, दिनांक २६ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात “जज–वकील–आरोपी” ही आगळीवेगळी आणि लक्षवेधी संकल्पना राबविण्यात आली, ज्याने उपस्थितांचे विशेष वेधले.​या दिमाखदार सोहळ्याचे अध्यक्षस्थान पी.डी.जी. लायन उमेशजी गांधी यांनी भूषविले, तर नवनिर्वाचित अध्यक्षा म्हणून लायन डॉ. अनुप्रिता पेडणेकर व त्यांच्या नवीन कार्यकारिणीने सूत्रे हाती घेतली.​कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात लायन ईश्वरन एन. व्ही. यांच्या सुरेल गणेश वंदनेने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. मावळते अध्यक्ष लायन संजयजी पिठवा यांनी स्वागत करत आपल्या कार्यकाळातील सामाजिक उपक्रमांचा लेखाजोखा मांडला आणि नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.​या सोहळ्यात इंडक्शन ऑफिसर पी.डी.जी. लायन सरस्वतीजी शंकर यांनी क्लबमध्ये नव्याने दाखल झालेल्या चार नवीन सदस्यांना शपथ देऊन त्यांचे लायन्स परिवारात स्वागत केले. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह कॅबिनेट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लायन सुरेशजी नागदा यांनी सर्व उपस्थितांकडून सेवाभावाची पुनःसमर्पण प्रतिज्ञा वदवून घेतली.​क्लबचे सचिव लायन विपुल चौधरी यांनी गतवर्षाचा अहवाल सादर केला, तर खजिनदार लायन अजित चौधरी यांनी आर्थिक ताळेबंद मांडला.​नवनिर्वाचित अध्यक्षा लायन डॉ. अनुप्रिता पेडणेकर यांनी आपल्या मनोगतात क्लबने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आगामी कार्यकाळात आरोग्य, शिक्षण आणि विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.​कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व इन्स्टॉलेशन ऑफिसर पी.डी.जी. लायन उमेशजी गांधी, पी.डी.जी. लायन सरस्वतीजी शंकर आणि सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सुनीलजी लावटी यांनी वसई पर्ल्सच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची प्रशंसा केली. तसेच नवीन टीमला जनहिताचे अधिकाधिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.​सोहळ्याचे एक विशेष आकर्षण म्हणजे क्लबचा १४ वा चार्टर्ड डे ठरला. कार्यक्रमाच्या सांगता समारोपप्रसंगी क्लबचे माजी अध्यक्ष व चार्टर प्रेसिडेंट लायन राजेश मोदगेकर आणि इतर चार्टर सदस्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच सर्व चार्टर सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.​कार्यक्रमास सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सुनीलजी लावटी, डी.सी. लायन मनमोहनजी गुप्ता, झोन चेअरपर्सन लायन निलेशजी घरत, सॅटेलाईट को-ऑर्डिनेटर लायन भारतीजी पवार यांच्यासह अनेक मान्यवर व लायन्स बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याचे खुमासदार व प्रभावी सूत्रसंचालन क्लबच्या माजी अध्यक्षा लायन इव्हेट कुटीन्हो, लायन अंजली मेस्त्री आणि लायन वर्षा मोदगेकर यांनी केले. आगळ्यावेगळ्या थीममुळे हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed